HW News Marathi
मुंबई

शिवसेनेकडून नगरसेवकांची पळवापळवी ?

पालिकेच्या राजकारणात खळबळ

मुंबई महापालिकेत सत्ता आबाधीत राहावी यासाठी शिवसेना धडपड सुरू केली आहे. भाजपकडून दगा फटका होवू नये यासाठी खबरदारी घेतली जाते. त्यातूनच शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी आणि पळवापळवी होवू शकते अशी तक्रार भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी अँटी करप्शन, निवडणूक आयोग आणि कोकण विभागिय आयुक्तांकडे केली आहे.

संभाव्य फोडाफोडी टळावी यासाठी हे पत्र लिहीले असल्याचे सोमय्यांचे म्हणणे आहे. नेमके कोणत्या पक्षाचे नगरसेवक फोडले जात आहेत याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही. कोट्यवधी रूपये देवून या नगरसेवकांना खरेदी केली जात आहे. तर काही नगरसेवकांना जबरदजस्तीने ताब्यात ठेवण्यात आल्या आले असल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. अशा भ्रष्ठ आणि लोकशाही विरोधी कारवाई करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी या पत्रातून त्यांनी केली आहे. शिवाय जे नगरसेवक फुटले आहेत त्यांचीही चौकशी केली जावी असे ते म्हणाले. दरम्यान काही नगरसेवकांना शिवसेना कोकण आयुक्तांकडे नेवून वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळत आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भिडे गुरुजींच्या अटकेचा प्रश्न विधानसभेत

News Desk

विश्वास प्रस्तावावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ

News Desk

मांजर फेकल्याच्या जाब विचारला म्हणून महिलेचा खून

News Desk