HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतात…..

पुणे | भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी सुसंगत भूमिका वाटली तर भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतात, शक्यता नाकारता येत नाही अशी भूमिका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच नेतृत्व मान्य करून भाजपलापूरक अशी भूमिका स्वीकारली तर भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात . २०१४ आधी राज ठाकरे यांच्या इतकी मोदींची स्तुती देशात कोणत्याही राजकीय नेत्याने केलेली नाही. त्यांना तीच जुनी भूमिका मान्य असेल तर एकत्र राजकारण शक्य असल्याची भुमिका भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मनसेच्या पहिल्या अधिवेशनाची घोषणा केली आहे. येत्या २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मनसेचे हे अधिवेशन महत्वपुर्ण आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत घरोबा केला आणि महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाली त्यामुळे शिवसेनेचे कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे मनसे आता नव्याने हिंदुत्ववादी भुमिका स्विकारणार का आणि भाजपसोबत जाणार का अशी चर्चांना उधाण आले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त भेटसुद्धा झाली आहे. त्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावरच्या हसुने निश्चितपणे अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये मनसेचे नेतसुद्धा भाजपसोबत जाण्याचे संकेत देणारे ट्विट करत आहेत तर भाजपचे नेतेसुद्धा सकारात्मक प्रतिक्रीया देत आहेत.त्यामुळे येत्या २३ जानेवारीला महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके कोणते बदल होणार हे पाहणे महत्वाचे असेल .

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तास्थापनेचा घोळ घालायचा,अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी !

News Desk

भारतीय क्रिकेट टीमचे विमान मुंबईत लॅंड करण्यामागे शरद पवार!

News Desk

नारायण राणे यांना शिवसेना का घाबरते?

News Desk