HW News Marathi
महाराष्ट्र

…म्हणून मी अजित पवारांच्या सत्काराला आलो नाही !

बारामती | राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शुक्रवारी (१० जानेवारी) अजित पवार हे पहिल्यांदाच आपला बालेकिल्ला असलेल्या बारामतीत दाखल झाले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत भव्य मिरवणूक काढत आणि सत्कार करत अजित पवार यांचे जंगी स्वागत केले. मात्र, बारामतीकरांनी अजित पवारांच्या केलेल्या या भव्य सत्कारादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांच्या आणि कुटुंबियांच्या अनुपस्थितीने अनेक चर्चांना उधाण आले.

मात्र, आता रोहित पवार यांनी आपल्या अनुपस्थितीमागचे कारण स्पष्ट केले आहे. “पवार कुटुंब नेहमीच एकत्र आहे. अजितदादा म्हणाले म्हणूनच मी आलो नाही”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. “मी माझ्या मतदारसंघात होतो. मला अजित दादांनी फोन करून ‘कुठे आहेस ?’ विचारले. तेव्हा मी त्यांना देखील सांगितलं की, मी माझ्या मतदारसंघात आहे. अजितदादांचा बारामतीतील तो सत्कार हा अचानक ठरला होता. त्यामुळे दादा म्हणले की, हा सत्कार अचानक ठरलेला आहे.

मात्र, आपल्याला लोक महत्त्वाचे आहेत. तू लोकांसोबत राहा. म्हणूनच मी अजितदादांच्या सत्कार कार्यक्रमात आलो नाही”, असे रोहित पवार म्हणाले. त्याचप्रमाणे, यावेळी पवार कुटुंबात वाद असल्याच्या चर्चांना देखील रोहित पवार यांनी पूर्णविराम लावला आहे. “कोणीही चुकीचा अर्थ काढू नये. पवार कुटुंब हे कायमच एकत्र आहे, एकत्रच राहील. राज्याच्या विकासासाठी नेहमीच एकत्र राहू”, असे रोहित पवार यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमची सत्ता असताना आता इंधन दरवाढीवरून ट्विट करणारे अमिताभ आणि अक्षय गप्प का?”

News Desk

Dhangar Reservation । सरकारने केवळ गाजर दाखवण्याचे काम केले !

News Desk

‘हा’मुख्यमंत्री वाईट आहे ,आव्हाडं अस का म्हणाले ?

News Desk