HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या… आज मराठी पत्रकार दिन का ? साजरा करतात

महाराष्ट्रात ६ जानेवारी हा दिवशी मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, ६ जानेवारी हाच दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून का साजरा केला जातो, असा आपल्या सर्वांना पडणे सहाजिक आहे सर्वांच पडतो. या दिनाचे तुम्हाला काय महत्व आहे हे आपण थोडक्या जाणून घ्या..६ जानेवारी १८१२ बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस आहे. जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. या काळामध्ये बाळशास्त्रींनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोलाची भूमिका बजावली बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र सरकारतर्फे ‘दर्पण दिन’ अथवा ‘वृत्तपत्र दिन’ म्हणून साजरा होतो.

इ.स. १८२५ साली जांभेकरांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा मानसन्मान झाला होता.

मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकवताना, समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. त्यांना जाणवले की, केवळ महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही, तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले.आपले सहयोगी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.

वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ त्यांनी इ.स. १८४० साली सुरू केले.‘दिग्दर्शन’ मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत.आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘राष्ट्रजागृतीचे अग्रदूत’ म्हटले आहे. ६ जानेवारी, इ.स. १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पटोले-थोरातांना फडणवीसांवर विश्वास, म्हणाले….!

News Desk

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी आमचा विरोध – बाळासाहेब थोरात 

News Desk

वर्ध्यात प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणारा आरोपी विकी नगराळेला अटक

News Desk