HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकासआघाडीचे खातेवाटप सामनातून जाहीर, जाणून घ्या कोणाला कोणती खाती 

मुंबई। महाविकासआघाडी सरकारच्या बहुप्रतीक्षित असे खातेवाटप सामनातून जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे खातेवाटप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. खातेवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मंजुरीसाठी काल (४ जानेवारी) रात्री ९.४५ वाजता राजभवनवर रवानाही करण्यात आली. मात्र राज्यपाल विश्रांती घेत असल्याने ते आज सकाळीच या यादीवर मंजुरीची स्वाक्षरी केली आहे. राज्यपालांच्या ‘विश्रांतीयोगा’मुळे मंत्रिमंडळाचे खातेवाटप पुन्हा रखडले, असा उल्लेख सामनामध्ये करण्यात आला आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा ३० डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर मंत्र्यांना बंगला आणि दालनाचे वाटपही झाले. मात्र खातेवाटप अंतिम होत नव्हते. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकाही झाल्या. आज (५ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर खातेवाटप जाहीर करणार आहे.

जाणून घ्या कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती

कॅबिनेट मंत्री

  • उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री – सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, व इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमुन न दिलेले विषय/खाती
  • अजित अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री – वित्त, नियोजन
  • सुभाष राजाराम देसाई – उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा
  • अशोक शंकरराव चव्हाण – सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)
  • छगन चंद्रकांत भुजबळ – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  • दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील – कामगार, राज्य उत्पादन शुल्क
  • जयंत राजाराम पाटील – जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
  • नवाब मोहम्मद इस्लाम मलिक – अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता
  • अनिल वसंतराव देशमुख – गृह
  • विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात – महसूल
  • राजेंद्र भास्करराव शिंगणे – अन्न व औषध प्रशासन
  • राजेश अंकुशराव टोपे – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  • हसन मियालाल मुश्रीफ – ग्राम विकास
  • नितीन काशिनाथ राऊत – उर्जा
  • श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड – शालेय शिक्षण
  • डॉ.जितेंद्र सतिश आव्हाड – गृहनिर्माण
  • एकनाथ संभाजी शिंदे – नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
  • सुनिल छत्रपाल केदार – पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण
  • विजय वडेट्टीवार – इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन
  • अमित विलासराव देशमुख – वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य
  • उदय रविंद्र सामंत – उच्च व तंत्र शिक्षण
  • दादाजी दगडू भुसे – कृषि, माजी सैनिक कल्याण
  • संजय दुलिचंद राठोड – वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
  • गुलाबराव रघुनाथ पाटील – पाणी पुरवठा व स्वच्छता
  • ॲड. के.सी. पाडवी – आदिवासी विकास
  • संदिपानराव आसाराम भुमरे – रोजगार हमी, फलोत्पादन
  • बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील – सहकार, पणन
  • ॲड. अनिल दत्तात्रय परब – परिवहन, संसदीय कार्य
  • अस्लम रमजान अली शेख – वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास
  • ॲड. यशोमती ठाकूर (सोनवने) – महिला व बालविकास
  • शंकराराव यशवंतराव गडाख – मृद व जलसंधारण
  • धनंजय पंडितराव मुंडे – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
  • आदित्य उद्धव ठाकरे – पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

राज्यमंत्री

  • अब्दुल नबी सत्तार – महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य
  • सतेज उर्फ बंटी डी. पाटील – गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण
  • शंभुराज शिवाजीराव देसाई – गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन
  • ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू – जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार
  • दत्तात्रय विठोबा भरणे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन
  • डॉ. विश्वजीत पतंगराव कदम – सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा
  • राजेंद्र श्यामगोंडा पाटील यड्रावकर – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य
  • संजय बाबुराव बनसोडे – पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य
  • प्राजक्त प्रसादराव तनपुरे – नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन
  • श्रीमती आदिती सुनिल तटकरे – उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामान्य माणसाला न्याय हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य; सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या! – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Aprna

बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवीवर कन्नड नागरिकांनी फासले काळे

News Desk

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती करण्याला आक्षेप घेणारी याचिका दाखल

News Desk