HW News Marathi
महाराष्ट्र

थोड्याच वेळात जाहीर होणार खातेवाटप

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘सह्याद्री’वर दाखल झाले आहेत आणि आता लवकरच खातेवाटप जाहीर करुन ते हा गुंता सोडवणार आहेत. आज (४ जानेवारी) सकाळी शिवसेनेतील अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत महाविकास आघाडीच्या सरकारला धक्का दिला होता. दरम्यान माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही केला होता आणि अंतिम टप्प्यात अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला नाही आणि त्याची नाराजी दुर झाली असल्याची माहिती खोतकरांनी दिली.

एकीकडे कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने सत्तार यांनी राजीनामा दिल्याची बातमी होती तर दुसरीकडे जालन्यातील काँग्रेस आमदार कैलास गोरंट्यालही महाविकास आघाडीला राजीनाम्याचा धक्का देणाच्या तयारीत होते. मंत्रीपदासाठी डावलून पक्षाने आपल्यावर मर्यादा घातल्याचे सांगत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करणाऱ्या खातेवाटपात कोणते आमदार, मंत्री खूश राहणार की पुन्हा एकदा महाविकास आघाडीला राजीनाम्यांचे धक्के पचवावे लागणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तेजस ठाकरेंनी केलेले काम महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे, आशिष शेलारांनी थोपटली पाठ

News Desk

भाजप शिवसेना युती तुटल्याने आठवले नाराज, आरपीआय आता भाजप ला साथ देणार

News Desk

उदयनराजे जिल्हा बॅंकेत आले आणि विचारला एकच प्रश्न…

News Desk