HW News Marathi
मुंबई

चेंगराचेंरीत मृत झालेला तरूण जीवंत

मुंबई – एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 35 वर्षीय तरुण इमरान शेखरचंही नाव आहे. मात्र, मृत्यूमुखी म्हणून पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेला इमरान शेख जिवंत असल्याचे समोर आले आहे. परळ-एलफिन्स्टन रेल्वे ब्रिजवर झालेल्या दुर्घटनेनंतर इमरान शेख आपले मित्र आणि नातेवाइकांना फोन करून आपण जिवंत असल्याचे सांगत आहे.

गैरसमज झाल्यामुळे इमरान शेखचे नाव मृतांच्या यादीत आल्याचे सांगितले जात आहे. आधी प्रसारमाध्यमांकडून इमरान शेख याचे नाव मृतांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते, आणि आता तर एलफिन्स्टन स्थानकाबाहेर मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर इमरान शेख यांचा फोटो आणि नाव आले आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दादरमध्ये काम करणाºया कपडा व्यापारी इमरान शेख याने सांगितले आहे की, तो आपले काका मसूद आलम यांच्यासोबत परळ ते दादरपर्यंत प्रवास करत होता.

ज्या दिवशी दुर्घटना झाली त्या दिवशी माझे काका परळला उतरले होते, आणि मी दादर स्थानकावर उतरलो होतो. या दुर्घटनेत माझे काका मसूद आलम यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर मीडियाने माझ्याशी संपर्क साधत काकांचा फोटो मागितला. माझ्याकडे एकच फोटो होता. ज्यामध्ये मी आणि काका सोबत होतो’, असं इमरान शेखने सांगितले आहे. काहीतरी गैरसमज झाला आणि मृतांमध्ये शेख असे नाव दाखवण्यात आले. यानंतर इमरान शेखच्या मोबाइलवर मित्र आणि नातेवाईकांचे फोन आणि मेसेजेस येण्यास सुरुवात झाली. यानंतर इमरान शेखला मीडियामध्ये काकांच्या जागी आपला फोटो दाखवला जात असल्याचे कळले. यानंतर त्याने तात्काळ प्रसारमाध्यमांशी संपर्क साधत आपली चूक सुधारण्यास सांगितले.

मीडियाने आपली चूक सुधारली पण एल्फिन्स्टन स्थानकाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरवरील फोटोचे काय करायचे हे इमरान शेखला कळत नव्हतं. स्थानिक नेत्यांनी हा बॅनर लावला असून, नेमका कोणाशी संपर्क साधायचा हे कळत नाहीये असं इमरान शेखने सांगितलं आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांनी कळवले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी तब्बल ११ तासांचा मेगाब्लॉक

News Desk

लोकलचे दरवाजे बंद केल्य‍ास कारवाई होणार

News Desk

प्रभाग क्रमांक 56 मध्ये महिला पत्रकार दीप्ती यांना मतदारांचा भरघोस पाठिंबा

News Desk