HW News Marathi
महाराष्ट्र

जळगावात खडसे-फडणवीसांची भेट, चर्चादरम्यान महाजन उपस्थित

जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जळगावमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यान माजी मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. खडसे आणि फडणवीस यांच्या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याचे खडसेंनी सांगितले भाजपमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे बैठकीनंतर महाजनांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

देवेंद्र फडणवीस आणि माजी गिरीश महाजन या दोघांनी माझे विधानसभेचे तिकीट कापले गेले, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. यानंतर राज्याचे राजकारण चांगले ढवळून निघाले होते. यानंतर विधानसभेचे फडणवीस हे आज (३ जानेवारी ) जळगावमध्ये दाखल झाले आहेत. धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस दोन दिवस उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.खडसे-फडणवीस यांच्या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागेल आहे.

कोल्हापूर आणि नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या हातातून सत्ता गेली आहे. यानंतर आता जळगाव जिल्हा परिषदेवर एकनाथ खडसेंचे वर्चस्व आहे. यामुळे फडणवीस खडसेंची मनधरणी करत जिल्हा परिषद काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर विषयासंदर्भात महाजनांनी गुरुवारी (२ जानेवारी) दुपारी जामनेरात आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधत खडसे यांच्या आरोपात तथ्य नसून त्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे बोलणे संयुक्तीक नाही, असेही म्हटले होते. त्यानंतर जळगाव येथे संध्याकाळी जि.प. अध्यक्ष निवडीसंदर्भात भाजपची बैठक झाली. या निमित्ताने खडसे व महाजन एकत्र आले भाजप कार्यालयात ते दोघेही शेजारी-शेजारी बसले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोंगरांतील गावांचे सर्वेक्षण करून पुनर्वसन करा, रामदास आठवलेंकडून तळीये दुर्घटनास्थळाची पाहणी!

News Desk

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली मदत

News Desk

शक्य तितक्या लवकर इम्पिरिकल डाटा देण्याची छगन भुजबळांनी केली मागणी

Aprna