HW News Marathi
देश / विदेश

बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला, जनरल कासिम सुलेमानी ठार

बगदाद | इराणची राजधानी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्लात ईराणच्या कद्स फोर्सचा प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी हवाई हल्ल्यात मारला गेला. सुलेमानी यांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हा हल्ला करत त्यांना ठार मारले.

सुलेमानी हा पश्चिम आशियात ईराणी कार्यक्रम राबवणारा प्रमुख रणनीतिकार तर होता. पण, सीरियात आपली पाळेमुळे घट्ट करणे, इस्रायलमध्ये रॉकेट हल्ला करणे हे आरोपही सुलेमानी यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. दीर्घ काळापासून अमेरिका सुलेमानीच्या शोधात होती. अखेर हवाई हल्ल्यात त्यांचा खात्मा करण्यात त्यांना यश आले. बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराण समर्थक मिलिशियाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हल्ला करण्यात आला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरुच, जिल्हाध्यक्षांकडे ७४ राजीनामे

News Desk

महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान

Aprna

मौनी मोदी, बँक घोटाळ्यावर शांत का ?  कॉंग्रेसची मोदींवर टीका

swarit