HW News Marathi
महाराष्ट्र

कॅबिनेट मंत्री गुलाबरा पाटील यांच्या स्वागतादरम्यान चेंगराचेंगरी, २ महिला, ५ जण जखमी

जळगाव | शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना ठाकरे सरकारच्या कॅबिनेट मंत्री पदी स्थान मिळाले आहे. यानंतर गुलाबर पाटील हे आज (१ जानेवारी ) जळगावला दाखल झाले आहे. यावेळी पाटालांचे स्वागताला प्रचंड गर्दी होती. जळगाव रेल्वे स्टेशनवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीची घटनात दोन महिला पदाधिकाऱ्यांसह पाच जण जखमी झाले.

त्यावेळी पाटील स्थानकातून बाहेर पडत असतानाच जिन्यामध्ये लोकांची गर्दी वाढली आणि काही कार्यकर्त्यांचा जिन्यातच तोल गेला. या गराड्यात शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मंगला बारी आणि शोभा चौधरी जखमी झाल्या तर बँड पथकातील एका तरुणाच्या हाताला दुखापत झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेदरम्यान पाटील हे कार्यकर्त्यांच्या गर्दीत अडकले होते. तेव्हा त्यांच्या पोलिसांनी सुरक्षितपणे त्यांना त्या गर्दीतून बाहेर काढत सुखरुप स्थानकाबाहेर नेले. आणि त्यानंतर त्यांच्या मिरवणूकीला जंगी सुरुवात झाली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांकडे १२ नावांची यादी पोहोचली, प्रतीक्षा निर्णयाची!

News Desk

शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड पोहरागडला जाणार, शासकीय दौरा जाहीर

News Desk

परळीत मुंडे बहीण भाऊ एकच!; काँग्रेसच्या शहर अध्यक्षांचा गंभीर आरोप

News Desk