HW News Marathi
महाराष्ट्र

पाथर्डीत स्फोटके सापडल्याने खळबळ

नाशिक पाथर्डी येथील गौळाण रस्त्यावर बेवारस गोणीत जिलेटीनच्या 60 कांडया आणि 17 डिटोनेटर्स सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री या घटनेची माहिती पोलिसांना मिळाताच पोलिसांनी बॉम्ब शोधक पथक घेऊन घटना स्थाळी दाखल झाले. बॉम्बशोधक पथक स्फोटकाची गोणी ताब्यात घेऊन अज्ञात व्यक्तीच्या विऱाधात गुन्हा दाखल केला आह.

इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील गौळाणे रस्त्यावर असलेल्या मोंढी वस्तीलगत रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला एका बेवारस स्थितीतील गोणी नागरिकांना आढळून आली़ या गोणीमध्ये संशयास्पद वस्तू आढळून आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली़ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी पोहोचल्यानंतर त्यांनी बॉम्बशोधक व नाशक पथकास माहिती दिली़. या पथकाने वस्तुची तपासणी केली असता ६० जिलेटीनच्या कांड्या व १७ डिटोनेटर्स आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहेत़

या प्रकरणी पोलीस हवालदार दत्तात्रय पाळदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुला- मुलींच्या सम-विषम वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांची निर्दोष मुक्तता

News Desk

अनिल देशमुखांच्या घरी आयकर विभागाची तब्बल 16 तास झाडाझडती!

News Desk

राणे,नवनीत राणांनंतर आता महाराष्ट्रात ‘राष्ट्रपती राजवटीची’ आठवलेंची मागणी!

News Desk