HW News Marathi
राजकारण

गरज भासली तर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देणार !

नवी दिल्ली | काँग्रेसला गरज भासली तर आम्ही त्यांना पाठिंबा देण्यास तयार असल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर रविवारी (१९ मे) संध्याकाळी विविध वृत्तवाहिन्यांनी आणि वृत्तसंस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोल्सनुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्येही एनडीएला बहुमत मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या निकालानंतरच्या रणनीतीला मोठा वेग आला आहे.

एकीकडे बसप अध्यक्षा मायावती यांनी एक्झिट पोल्सच्या पार्श्वभूमीवर सावध भूमिका घेत दिल्लीत होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे अखिलेश यादव यांनी काँग्रेसला गरज लागली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे स्पष्ट केले आहे. “देशात एकता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असलेले देशातील राजकीय पक्ष २३ मे नंतर देशाला नवीन पंतप्रधान देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू अनेक नेत्यांची भेट घेऊन चर्चा करीत आहेत. काँग्रेसला गरज भासली तर आम्ही देखील पाठिंबा देऊ”, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पर्रीकर यांना दिल्लीतच ठेवून गोव्यात नवी घडी निर्माण करता आली असती | ठाकरे

News Desk

काँग्रेस-टीडीपी खिसेकापणाऱ्या जमातीचा पक्ष !

News Desk

राज्यात जनतेवर विषप्रयोग करणारे सरकारः खा. अशोक चव्हाण

News Desk