HW News Marathi
राजकारण

मायावती विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होणार नाहीत, बसपचा खुलासा

नवी दिल्ली | यंदाच्या लोकसभा निवडणुकांचा अंतिम टप्पा पार पडल्यानंतर रविवारी (१९ मे) संध्याकाळी विविध वृत्तवाहिन्यांनी आणि वृत्तसंस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोल्सनुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्येही एनडीएला बहुमत मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बसपच्या अध्यक्षा मायावती या सोमवारी (२० मे) विरोधी पक्षनेत्यांसोबतच्या बैठकीसाठी दिल्ल्लीत येतील अशी चर्चा होती. मात्र, मायावती या दिल्लीत येणार नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मायावती या सोमवारी दिल्लीत येऊन विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेऊन, चर्चा करून लोकसभेच्या निकालानंतरची आपली रणनिती ठरवतील, अशी जोरदार चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत होती. मात्र, आता पक्षाकडून या सर्व चर्चांना पूर्ण विराम देण्यात आला आहे. मायावती या अशा कोणत्याही बैठकीसाठी दिल्लीत येणार नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सनंतर बसपकडून हि सावध भूमिका घेतली जात असल्याचे देखील म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्तांधारीमध्ये धक्काबुक्की; अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Aprna

मतदान केल्यानंतर कुंभमेळ्यात स्नान केल्याचे भाग्य लाभते | पंतप्रधान मोदी

News Desk

दुसऱ्याच दिवशी अधिवेशनाचे कामकाज तहकूब

News Desk