HW News Marathi
महाराष्ट्र

…तर मातोश्रीवरही कॅमेरे लागतील | चंद्रकांत पाटील

सोमवारी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणर आहे. अशातच शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद देऊ नये असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद दिल्यास मातोश्रीवरही कॅमेरे लागतील, असंही ते म्हणाले.

अर्थखातं, महसूल खातं, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आता गृहमंत्रिपदही दिलं तर तुमच्याकडे काय केवळ मुख्यमंत्रिपद ठेवणार का ? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद देऊ नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

ठाकरेंचा यु-टर्न

सरकारने शेतकऱ्यांना दिलेली दोन लाखांची कर्जमाफी स्वागतार्ह आहे. मात्र ही शुद्ध फसवणूक आहे अशी टीका पाटील यांनी केली होती. “सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली दोन लाखाची कर्जमाफी ही फसवणूक आहे. उद्धव ठाकरे यांनी जो शब्द दिला होता तो पाळला नाही. त्यांनी दिलेल्या शब्दावरुन यु-टर्न मारला आहे,” असं ते म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महावीर जयंती, हनुमान जयंती, ‘शब्ब-ए-बारात’साठी घराबाहेर पडू नका, उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

News Desk

आज वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी कॉंग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक !

News Desk

ज्यांना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही…!

News Desk