HW News Marathi
महाराष्ट्र

तरूणीवर सामुहिक बलात्कार, बलात्कार प्रकरणी तीन तरूणींना अटक

नागपूरमध्ये एका कॉलसेंटरमध्ये काम करणा-या तरूणीवर सामुहिक बलात्कार झाला. या कटात पीडिताच्या तीन मैत्रीणी देखील सहभाग आहेत. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन तरूणींना अटक केेले असून पुढील तपास पोलिस करत आहेत .

पीडित तरुणी एका कॉल सेंटरमध्ये काम करते. तेथेच काम करणा-या सुप्रिया पाटील (रा. उदयनगर) सोबत तसेच कॅटरर्समध्ये काम करणा-या लीना ऊर्फ श्रेया धांदेसोबत तिची मैत्री होती. सुप्रिया आणि लीनाची एक मैत्रिण मानकापूरला सदनिकेत राहते. १० सप्टेंबरला दुपारी १२.३० वाजता सुप्रिया आणि लीनाने पीडित मुलीला उदयनगरातून मानकापूरला मैत्रिणीच्या सदनिकेत नेले. तेथे एक अनोळखी व्यक्ती होती. पीडित तरुणीला आरोपींनी शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. तिची शुद्ध हरपल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत दोन ते चार आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती शुद्धीवर आल्यानंतर तिला असह्य वेदना होऊ लागल्या. शुद्धीवर आल्यानंतर तिने याबाबत मैत्रिणींना जाब विचारला असता त्यांनी तिला बदनामीचा धाक दाखवून गप्प बसण्याचा सल्ला दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीकेपी बँकेचा RBI ने केला परवाना रद्द

News Desk

“काळजी करू नका… लवकर बरे व्हा”, मुख्यमंत्र्यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा

Aprna

कॅग’च्या अहवालाने मागील सत्ताधाऱ्यांच्या जलयुक्त शिवार योजनेतील फसवणुकीचा फुगा फुटला 

News Desk