HW News Marathi
देश / विदेश

‘शरद पवार- संजय राऊत’ मुलाखतीचा सामना या कारणामुळे रद्द….

पुणे | साहित्यिक कलावंत संमेलनातील ज्येष्ठ नेते शरद पवार -संजय राऊत यांची नियोजित प्रकट मुलाखत तात्पुरती रद्द करण्यात अली आहे .पुणे येथील साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दिनांक 28 आणि 29 रोजी आयोजित 19 व्या साहित्यिक कलावंत संमेलनातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नियोजित प्रकट मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत ही मुलाखत घेणार होते. मात्र, राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे ही मुलाखत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसातच ही मुलाखत आयोजित करण्यात येईल. तसेच दिनांक 28 आणि 29 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड, पुणे येथे आयोजित 19 व्या साहित्यिक कलावंत संमेलनातील उर्वरित सर्व कार्यक्रम नियोजित वेळेतच होणार आहेत, असे साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आणि सचिव वि.दा. पिंगळे यांनी कळविले आहे.

भाजपाला बाजूला ठेवत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. त्यावेळी पवार यांच्यासोबत शिवसेनेतर्फे राऊत यांचीही भूमिका महत्वाची ठरली होती. त्यामुळे सत्तास्थापनेची अनेक गुपित आणि महाराष्ट्राला हव्या असणाऱ्या अनेक प्रश्नांचा उलघडा या मुलाखतीतून होणार होता . मात्र आता तरी पवार- राऊत यांच्यामधला सामना रद्द करण्यात आला आहे.

यापूर्वी पुण्यातच राज ठाकरे यांनी पवार यांची मुलाखत घेतली होती. ती मुलाखत सोशल मीडिया आणि राजकीय विश्वात चांगलीच गाजली होती. त्यामुळे राऊत आणि पवार मुलाखतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होत . मात्र आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे ही नियोजित मुलखात पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र १९’वे साहित्यिक कलावंत संमेलन हे २८ आणि २९ डिसेंबर याच काळात पार पडणार असून फक्त मुलाखतीचे आयोजन नंतर करण्यात येईल असे, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आणि सचिव वि.दा. पिंगळे यांनी कळविले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या १० दहशतवाद्यांना अटक

News Desk

राज्यात २५ लाख ८१ हजार ५९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला !

News Desk

रोहिंग्यांच्या छावण्यांमध्ये रोज ६० बालकांचा होतो जन्म

News Desk