आरती मोरे | आज भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींची आज ९५ वी जयंती. एक कवीमनाचा नेता , सभागृहात फक्त आपल्याच पक्षातल्या नाही तर सर्व विरोधकांना बांधून ठेवणार व्यक्तिमत्व.. अटल बिहारी वाजपेयी भाजपचे असले तर सर्व पक्षातील नेत्यांना त्यांचा नितांत आदर आहे. आपल्या शेवटच्या काही दिवसात अटलजी अंथरुणाला खिळून होते, पण आपली राजकीय, सामाजिक कारकीर्द त्यांनी अशी गाजवली कि प्रत्येकाच्या आठवणीत रहावी …अटलजींच्या आयुष्यातले काही असे किस्से ज्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख होते.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरून सध्या देशामध्ये वादंग सुरु आहे. मात्र, अटलजी परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी नेहरूंविषयी अशी भूमिका घेतली कि सगळ्यांना त्यांचा हेवा वाटावा.
- आणीबाणीनंतर १९७७ मध्ये मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये अटलजी परराष्ट्रमंत्री होते. परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर जेव्हा ते आपल्या विदेश मंत्रालयाच्या कार्यालयात गेले तेव्हा त्यांनी पाहिलं कि कार्यालयाच्या भिंतीवरून काहीतरी गायब आहे . वाजपेयींनी आपल्या सचिवाला बोलवलं आणि विचारलं कि या भिंतीवर तर पंडित जवाहरलाल नेहरूंचा फोटो होता. याआधी मी खूपवेळा या कार्यालयात येऊन गेलो आहे ,तो फोटो आता कुठे गेला ? त्यानंतर त्यांना कळलं कि जेव्हा देशात काँग्रेस सरकार जाऊन जनसंघाच सरकार आलं तेव्हा विदेश मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना वाटलं कि जनसंघाच्या नेत्यांना नेहरूंचा फोटो कार्यालयात लावलेला आवडणार नाही ..जनसंघाच्या नेत्यांना खुश करायला अधिकाऱ्यांनी नेहरूंचा कार्यालयातील फोटो हटवला होता . परंतु वाजपेयी परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना आदेश दिला कि लवकरात लवकर नेहरूंचा फोटो त्या भिंतीवर लावला जावा …
अटलजींनी पाकिस्तानमध्ये निवडणूक लढली असती, तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त झालं असतं.
- मोरारजींच्या सरकारमध्ये अटलजी परराष्ट्रमंत्री होते आणि त्यांची लोकप्रियता पाकिस्तानमध्येसुद्धा होती. मोरारजींचे सरकार जास्ती काळ चालले नाही. हे सरकार पडल्यांनंतरच्या काही दिवसांनंतरची गोष्ट आहे , वाजपेयी आपल्या घरी निवांत चहाचे घोट घेत होते . तेव्हा पाकिस्तानचे उचायुक्त अब्दुल सत्तार वाजपेयींसाठी एक भेटवस्तू घेऊन आले . सत्तार अटलजींना म्हणाले कि तुम्ही पाकिस्तानमध्ये इतके लोकप्रिय आहेत कि जर तुम्ही पाकिस्तानमधून निवडणूक लढली तर तुमच्या समोर असणाऱ्या विरोधकांचं डिपॉझिटसुद्धा जप्त होईल. सत्तारांनी सांगितलं कि हि भेटवस्तू जनरल जिया उल हक यांनी त्यांच्यासाठी पाठवली आहे .ती भेटवस्तू म्हणजे एक पठाणी सूट होता. वाजपेयींनी ती भेटवस्तू घेतली आणि ते खोलीत गेले आणि काही वेळात पठाणी सूट घालून बाहेर आले . आणि सत्तारांना म्हणाले कि जनरल साहेबाना सांगा मी त्यांची भेटवस्तू स्वीकारून ती परिधान केली आहे .
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.