HW News Marathi
महाराष्ट्र

ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करा, आदित्य ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

नवी दिल्ली | राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरत फेसबुकवर पोस्ट टाकील होती. यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत त्या व्यक्तीचे मुंडण केले. या प्रकारानंतर शिवसैनिकांवर सर्वत्र ट्रोलर्स झाली. यानंतर शिवसेना युवा नेता आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्रोलर्सना सडतोड उत्तर दिली. आदित्य ठाकरे म्हणाले की, ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाकडे लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, “सोशल मीडियावर ट्रोलिंग करणाऱ्यांकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करावे. त्याऐवजी आपण लोकांची कामे करावीत. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण कशी होतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. लोकांची कामे पूर्ण करून त्यांची मने जिंकायची आहेत. ट्रोलिंग करणाऱ्यांना आपल्या कामातून उत्तर द्यायला हवे असे आदित्य यांनी म्हटले आहे. रोजगार निर्मिती करणे आणि अर्थव्यवस्था सुरळीत करण्यास हातभार लावणे हे ट्रोलिंग करणाऱ्यांना उत्तर असणार आहे. “

” कायदा सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी असून कुणीही कायदा हातात घेऊ नये. हे ट्रोल सगळ्यांबदद्ल आक्षेपार्ह भाषा वापरतात. अगदी बायका आणि लहान मुलांनाही सोडत नाही. अशा लोकांना उत्तरे देणे हे आपले काम नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांच्या तर्कहीन तक्रारी कुणी ऐकून घेत नाही.” आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, आपल्या नेत्याविरुद्ध, समाजाविरुद्ध, कुणी काही बोलले तर राग येणे मी समजू शकतो. या ट्रोलना देशातले काही मोठे नेतेसुद्धा सोशल मीडियावर फॉलो करतात. पण मी म्हणतो की त्यापेक्षा आपण आपल्या मुख्यमंत्र्यांना फॉलो करूया. ते शांत, स्थिरचित्त आहेत. ते फक्त आश्वासनं पूर्ण करण्याबाबत आणि लोकांची सेवा करण्याबाबत आक्रमक असतात.”

नेमके काय आहे प्रकरण

दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर १५ डिसेंबर रोजी जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या घटनेचा निषेध देशभरातील विविध ठिकाणांहून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाविरोधात वडाळात राहणाऱ्या हिरामणी तिवारी या व्यक्तीने फेसबूक पोस्ट टाकली होती. मात्र त्याला विरोध करताना शिवसैनिकांनी मात्र कायदाच हातात घेतला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आईलाही सेल्फीचा मोह’,फोटो सोशल मीडियात व्हायरल!

News Desk

डिजीटल स्त्री शक्ती- राज्य महिला आयोगाचा उपक्रम, ५००० तरुणी होणार ‘सायबर सखी’

News Desk

संतापजनक! ऊस वाहतूक गाडी मालकाने १३ ऊसतोड मजुरांसह ९ लहान मुलांना ठेवले डांबून

Aprna