HW News Marathi
कृषी

गव्हावरील आयात शुल्क दुपटीने वाढणार

मुंबई- केंद्र सरकारकडून गव्हावरील येत्या काही दिवसांत गव्हावरील आयात शुल्क वाढविले जाण्याची शक्‍यता असल्याने व्यापारी आतापासूनच गव्हाची मोठ्या प्रमाणात आयात करत आहेत. दरम्यान, पुढील महिन्यात युक्रेनमधून १ लाख टन आयात गहू भारतातील बंदरात दाखल होणार आहे. भारतात आयात होणारा गव्हाचा दर प्रतिटन २०७-२१० डॉलर असा आहे. ऑक्‍टोबरपासून रब्बी गहू पिकासाठी पेरणी सुरू होणार आहे. रब्बीतील गहू पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी गव्हावरील आयात शुल्क केंद्राकडून दुपटीने वाढविले जाण्याची शक्‍यता आहे.

सध्या गहू आयातीवर १० टक्के शुल्क आहे. यामुळे देशात खासगी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गहू आयात केला जात आहे. याआधी देशातील व्यापाऱ्यांनी युक्रेन आणि रशियातून ६ लाख टन गहू आयातीसाठी करार केले आहेत. काळा समुद्र भूभागात गव्हाचे बंपर उत्पादन झाल्याने दर घसरले आहेत. यामुळे कमी किमतीत गहू मोठ्या प्रमाणात आयात केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

News Desk

शेतक-याने दिल्या जानकरांना शिव्या

News Desk

गुळ क्लस्टरसाठी निधी देऊ – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

News Desk