मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात अभिनेत्री केतकी चितळे हिने आक्षेपार्ह पोस्ट केली होती. राज्यभरातील अनेक जिल्ह्यात केतकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या केतकीला ठाणे न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या राज्यभरातून केतकीवर टीका होत असून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत केतकीच्या आक्षेपार्ह पोस्टचे समर्थन केले आहे. केतकी प्रकरणामध्ये प्रस्थापितांनी नेहमी विस्तापितांवर अन्याय केलेला आहे. म्हणून मी नेहमी बोलत असतो. “आमचा लढा वाडाविरोध गावगाडा आहे,” असे म्हणत खोतांनी तिचे समर्थन केले आहे.
तुम्ही केतकी चितळेचे समर्थन करताय का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर सदाभाऊ खोत म्हणाले, “मला वाटते ती कणखर आहे. तिझे समर्थन करायला महाराष्ट्रामध्ये कोणाची तिला गरज नाही. तिला मानावे लागेल. तिने न्यायालयात वकील न घेता स्वत:ची बाजू स्वत: मांडली. ज्यावेळी तिने ही पोस्ट व्हायरल केली. त्यावेळी तुमच्या कार्यकर्त्यांनी टीक टीप्पणी बघा, त्यांच्या कन्मेंट बघा म्हणजे तुम्ही केले की, पाटलांच्या पोरांने केले. दुसऱ्याने केले की कुंब्याच्या पोराने केले. हे धंदे बंद करा. प्रत्येकाला स्वाभिमान आहे. त्यामुळे मला वाटते केतकी प्रकरणामध्ये प्रस्थापितांनी नेहमी विस्तापितांवर अन्याय केलेला आहे. म्हणून मी नेहमी बोलत असतो. आमचा लढा वाडाविरोध गावगाडा आहे.”
सदाभाऊ खोत नेमके काय म्हणाले
“यावर माझे मत थोडसे वेगळे आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिने काही तरी तिने कोणीतरी लिहिलेली पोस्ट व्हायरल केली. ती पोस्ट माझ्या वाचण्यात आली नाही. परत तिला अटक झाली. अटक झाल्यानंतर दुसऱ्या बाजुला या देशामध्ये विशेष राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही. पोलीस व्यवस्था आहे की नाही. का पोलिसांचे अधिकार काढून घेतले आहे. कायदा संपुष्टात आलेला आहे का?, एखाद्या व्यक्तीला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असेल. तर पक्षाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये घुसतात. आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीवर हल्ला करतात. याचा अर्थ सरकार पुरस्कृत आंतकवाद राज्यात वाढवतात का?, तुमचा पोलिसांवर विश्वास नाहीये का?, या निमित्ताने हा मुद्दा पुढे येतो. दुसऱ्या बाजुला या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही काय पद्याव दिल्या होत्या. फडणवीसांच्या पत्नीबद्दल तुम्ही काय बोलेला होतात. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल तुम्ही काय बोलेला होतात. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा वेगळा शब्द वापरला होता. ते सुद्धा माझ्याकडे आहे. आणि त्यावेळी कुठे गेली ती नैतिकता. जेव्हा आपल्यावर एखादी गोष्ट येती. तेव्हा समाजामध्ये चिड निर्माण होती. त्यावेळी मात्र एक समाज म्हणून तिला टार्गेट केले जाते. मला वाटते तुमचा विधानपरिषदेचा आमदार अमोल मिटकीर भाषणामध्ये ब्राम्हण समाजाला टार्गेट करतो. खालच्या पातळीवर जावून बोलतो. त्यावेळी तुमची नैतिकता कुठे घसरलेली होती. आणि आजच कुठे नैतिका उफाळून आली आहे. फडणवीसांवर टीका करताना तुमच्या जिभेला हाड नव्हते. तेव्हा तुम्हाला थोर मोठ्यांचा अपमान करावे, असे वाटत नव्हते. जर समोरून दगड आला असेल. तर त्यांच्या अंगावर दगड पडतात. त्यांनी काय गुहेच्या आत लपून बसायचे. पण जहागीरदाने काही केले तर माफ, पण गरिबाने केले तर तो गुन्हा. जहागीरदाने केली तर ती कर्तबगारी. हे पारंपारिक चालत आलेले आहे. जहागीरदाने गुन्हा करावा आणि गरबाने माफी मागावे. जनतेने केले की त्याला अधिकार नाही, हक्क नाही आणि त्याने केले नाही म्हणून तुम्ही का करता. तुमच्या बापाने कोणी हक्क दिला होता. तुम्ही लाईस्न घेऊन आला का?,
तुम्ही केतकी चितळेचे समर्थन करताय का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर सदाभाऊ खोत म्हणाले, “मला वाटते ती कणखर आहे. तिझे समर्थन करायला महाराष्ट्रामध्ये कोणाची तिला गरज नाही. तिला मानावे लागेल. तिने न्यायालयात वकील न घेता स्वत:ची बाजू स्वत: मांडली. ज्यावेळी तिने ही पोस्ट व्हायरल केली. त्यावेळी तुमच्या कार्यकर्त्यांनी टीक टीप्पणी बघा, त्यांच्या कन्मेंट बघा म्हणजे तुम्ही केले की, पाटलांच्या पोरांने केले. दुसऱ्याने केले की कुंब्याच्या पोराने केले. हे धंदे बंद करा. प्रत्येकाला स्वाभिमान आहे. त्यामुळे मला वाटते केतकी प्रकरणामध्ये प्रस्थापितांनी नेहमी विस्तापितांवर अन्याय केलेला आहे. म्हणून मी नेहमी बोलत असतो. आमचा लढा वाडाविरोध गावगाडा आहे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.