HW News Marathi
देश / विदेश

तिरंग्याचा अपमान करणा-या डॉक्टरला आठवडाभर तिरंगा फडकावण्याची शिक्षा

वेल्लोर येथे तिरंग्याचा अपमान केल्याप्रकऱणी मद्रास उच्च न्यायालयाने मेडीकल अधिका-याला आठवडाभर तिरंगा फडकविण्याची शिक्षा सुनावली आहे.. अंबुर येथे सरकारी रूग्णालयात डॉक्टर ए. केन्नेडी यांच्यावर तिरंग्याचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी एन प्रकाश यांनी जामीन स्विकारताना अट ठेवली आहे. अटीनुसार डॉक्टर ए केन्नेडी यांना दर दिवशी सकाळी 10 वाजता अंबूर सरकारी रुग्णालयात तिरंगा फडकावयचा असून, तिरंग्याला सलाम करत राष्ट्रगीत गायचं आहे. डॉक्टर ए केन्नेडी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करतात की नाही यावर नजर ठेवण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला आहे. पोलिसांनी आदेशाचं पालन होत आहे की नाही याची माहिती न्यायालयाला द्यायची आहे. डॉक्टर ए केन्नेडी यांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत मंगळवारी पोलिसांच्या उपस्थितीत तिरंगा फडकावला आहे.

15 ऑगस्टच्या कार्यक्रमात जेव्हा तिरंगा फडकावला जात होता आणि राष्ट्रगीत गायले जात होते, तेव्हा डॉक्टर ए केन्नेडी फोनवर बोलत होते. डॉक्टर ए केन्नेडी यांचा फोनवर बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. डॉक्टर ए केन्नेडी यांनी तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप करत माजी नगसेवक सुरेश बाबू यांनी अंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर डॉक्टर ए केन्नेडी यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत जामिनासाठी अर्ज केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hyundai कंपनीच्या ‘त्या’ ट्वीटवरून वाद; कंपनीनं बिनशर्त माफी मागावी, शिवसेनेची मागणी

News Desk

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस

News Desk

वाघा बॉर्डरवर ‘बीटिंग द रिट्रीट’ होणार नाही

News Desk