HW News Marathi
मुंबई

पहिल्याच दिवशी महापालिका आयुक्तांचा जोरदार दणका

मुंबई | “शहरातील पाणी तुंबण्याची महत्त्वाची ठिकाणे शोधून काढली आहेत. तिथे पाण्याचा निचरा व्हावा यासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. मात्र या उपाययोजना करण्यामध्ये जे कोणी आडकाठी आणतील त्यांच्यावर डिजास्टर कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल”, असा स्पष्ट इशारा मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहे. पावसाळ्याची आपत्कालीन कामे योग्य वेळी पूर्ण करणे हीच आमची प्राथमिकता असल्याचे देखील प्रवीण परदेशी यांनी म्हटले आहे.

प्रवीण परदेशी यांची युनियन लीडर्स आणि महापालिकेच्या अभियंत्यांसोबत बैठक झाली आहे. यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे. “कामे करताना एसओपी (SOP) पाळल्या जात नाहीत. मात्र, यापुढे त्या कटाक्षाने पाळल्या जाव्यात”, अशी सूचना देखील आयुक्तांनी केली आहे. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी कोस्टल रोडप्रकरणी देखील भाष्य केले आहे. “कोस्टल रोडमुळे कोणाच्याही उपजिविकेवर विपरीत परिणाम होणार नाही. कोस्टल रोडमुळे मासेमारी नामशेष होणार नाही”, असा दावा प्रवीण परदेशी यांनी केला आहे.

प्रवीण परदेशी यांनी आजच (१३ मे) अयॉय मेहता यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी प्रवीण परदेशी हे मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत होते. तर अजॉय मेहता यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जोरदार पावसामुळे शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

News Desk

मुंबई शहरातील सुशोभीकरणाच्या कामात भ्रष्टाचार व ‘मॅचफिक्सींग’ भाजप आमदाराचा गंभीर आरोप

News Desk

Parel Fire | चिमुरडीने वाचवले कुटुंबियांचे प्राण

News Desk