HW News Marathi
मुंबई

पेट्रोल १५ पैशांनी, डिझेल १४ पैशांनी स्वस्त

मुंबई | पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाली असून पेट्रोल १५ तर डिझेल १४ पैशांनी यांच्या दरात कपात करण्यात आली आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर ८५ रुपये ७७ पैसे आहे. तर डिझेल ७३ रुपये ४३ पैशात असा आहे. कर्नाटक निवडणुकीनंतर सलग १६ दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत होती. सर्व स्तरातून सरकारवर टीका होऊ झाल्यानंतर १७व्या दिवशी पेट्रोल फक्त १ पैशांनी स्वस्त झाले होते. सरकारच्या या निर्णयानंतर ही टीका झाली होती.

सतत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होणाऱ्या वाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. एकूण १६ दिवसाच्या कालावधीत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३.८ रुपये तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३.३७ रुपयांनी वाढ झाली होती. परंतु आज मुंबई पेट्रोल १५ पैशांनी आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले आहे.

१ जूननंततर मुंबईतील पेट्रोलचे दर

१ जून – ८६.१०

२ जून- ८६.०१

३ जून- ८५.९२

४ जून – ८५.७७

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलगी वाचवा मुलगी शिकवा संदेश देणारी मोटार सायकल रॅली

News Desk

अतिवृष्टीत काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांची  ज्ञानदा प्रबोधन संस्थेने घेतली दखल

News Desk

सुनील शितपचा तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज

News Desk