HW News Marathi
देश / विदेश

देशातील १४ बाबांना ‘भोंदू’पद बहाल

इलाहाबाद (वृत्तसंस्था): भक्तांना आध्यात्माचे धडे देण्याऐवजी आपल्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार करणे, बेहिशोबी माया जमावणे तसेच धर्मपीठाविरूद्ध काम करणाºया देशातील १४ ‘महापुरूषां’ना भोंदू म्हणून घोषित करण्यात आले आहे. अलाहाबाद येथे झालेल्या आखाडा परिषदेच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. भोंदू बाबांविरोधात देशव्यापी बहिष्कार घालण्याचे आवाहनदेखील आखाडा परिषदेकडून नागरिकांना करण्यात आले.

आखाडा परिषदेने जाहीर केलेल्या १४ भोंदूबाबांच्या यादीत बाबा गुरमीत राम रहिम, आसाराम ऊर्फ आशुमल शिरमानी, आसारामचा मुलगा नारायण साई, सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँ, निर्मल बाबा ऊर्फ निर्मलजीत सिंह, सचिदानंत गिरी ऊर्फ सचिन दत्ता, ओम बाबा ऊर्फ विवेकानंद झा, इच्छाधारी भीमानंद ऊर्फ शिवमुर्ती द्विवेदी, स्वामी आसीमानंद ऊर्फ ओम नम: शिवाय बाबा, खुशी मुनी, बृहस्पती गिरी आणि मलकान गिरी या कथित बाबा-महाराजांचा समावेश आहे. ‘संत’ ही उपाधी देण्यासाठी एक प्रक्रिया निश्चित करण्याचा ठराव केला आहे. जेणेकरून भविष्यात राम रहिम सारख्या बाबांना या उपाधीचा गैरवापर करण्यापासून रोखता येईल. बाबा राम रहिमवरील बलात्काराचा गुन्ह्याचा दोषारोप सिद्ध होऊन त्याची रवानगी तुरुंगात झाल्याने हिंदू धर्माच्या धर्मगुरुंची सर्वोच्च संस्था असणाºया अखिल भारतीय आखाडा परिषदेला हे पाऊल उचलावे लागले आहे. दरम्यान, आखाडा परिषदेने जाहीर केलेल्या यादीमध्ये अनेक भोंदू बाबांचा समावेश करण्यात आलेला नाही. तो का गेला नाही, याबाबत उलटसुलट प्रश्न विचारले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही लोकशाहीसाठी लढणार आहोत! – के. चंद्रशेखर राव

Aprna

पीएनबी घोटाळा नव्हे तर ‘या’ कारणासाठी मी देश सोडला !

News Desk

तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या मुल्ला फजल ठार

News Desk