HW News Marathi
राजकारण

पुन्हा एकदा शहांच्या पश्चिम बंगालमधील सभेला परवानगी देण्यास ममतांचा नकार

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या आता फक्त अंतिम टप्पा बाकी असून १९ मे रोजी मतदान पार पडत आहे. पश्‍चिम बंगालतील राजकारण चांगलेच तापलेले चित्र पहायला मिळत आहे. भाजपचे अध्‍यक्ष अमित शहा यांच्‍या पश्‍चिम बंगालमधील जाधवपूर येथील प्रचार सभा आणि त्‍यांचे हेलिकॉप्‍टर लँडिंग करण्‍यास देखील परवानगी नाकारली आहे. शहा आज (१३ मे) पश्‍चिम बंगालच्‍या दौर्‍यावर आहेत. पश्‍चिम बंगालमधील तीन ठिकाणी त्‍यांच्‍या सभा आयोजित केल्‍या आहेत.

यापूर्वी देखील पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २२ फेब्रुवारीला भाजपचे अध्यक्ष अमति शहा यांच्या मालदा येथील रॅलीदरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरला लँडिगला परवानगी नाकारली होती. तेव्हा ममता यांनी भाजप नेत्यांना सुरभेचे कारणास्तव रॉली आणि हेलिकॉप्टर लँडिंगला परवानगी नाकारली होती. या प्रकारानंतर ममतांवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर त्यांनी रॅली आणि हेलिकॉप्टर लँडिंगला परवानगी दिली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींचा शपथविधी सोहळा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच !

News Desk

हे पेट्रोलचे नाव बदलायलाही मागेपुढे पाहणार नाहीत !

News Desk

अहमदनगरच्या जागेवरून राष्ट्रवादीत मतभेद ? 

News Desk