HW News Marathi
राजकारण

भाजपमधील नेते मोदींकडे गेले कि त्यांच्या बायका घाबरतात कारण… !

नवी दिल्ली | “भाजपमधील नेते मोदींकडे गेले कि त्यांच्या बायका घाबरतात. कारण, मोदींनी त्यांच्या पत्नीप्रमाणे आपल्यालाही आपल्या पतीपासून वेगळे करणार नाहीत ना ? अशी भीती त्यांना सतावते असते”, असे वादग्रस्त वक्तव्य बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींनी अलवार बलात्कार प्रकरणी मायावतींना लक्ष्य करत जोरदार टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर मायावती यांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.

मायावती यांच्या या विधानामुळे मात्र भाजपमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. “मायावतींनी पंतप्रधान मोदींसाठी वापरलेले शब्द हे अत्यंत अशोभनीय असून तुम्ही मोदींचा इतका तिरस्कार का करता ?”, असा सवाल भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. “मोदींना संपूर्ण देशाला आपले कुटुंब मानेल म्हणून त्याच्याबद्दल इतका द्वेष का ?”, असाही सवाल भाजपकडून करण्यात आला आहे.

“आपल्या राजकीय फायद्यासाठी आपल्या पत्नीला सोडणाऱ्या नरेंद्र मोदींना बहीण आणि पत्नीचा सन्मान करणे म्हणजे काय हे कसे समजणार ? भाजपमधील नेते मोदींकडे गेले कि त्यांच्या बायका घाबरतात. कारण, मोदींनी त्यांच्या पत्नीप्रमाणे आपल्यालाही आपल्या पतीपासून वेगळे करणार नाहीत ना ? अशी भीती त्यांना सतावते असते”, अशी टीका मायावती यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या राज्यात जनतेला ना राम मिळाला, ना रोजगार !

News Desk

विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, राज्यात आजपासून आचारसंहिता लागू

News Desk

#LokSabhaElections2019 : मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अचानक जानकरांचा सूर बदलला !

News Desk