HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक आज (१३ मे) विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या कोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असल्याची माहिती मिळाली आहे. डोंबिवलीहून सीएसटीकडे जाणारी धिम्या मार्गावरील लोकलची वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना कार्यालयात पोहचण्यास विलंब होणार आहे. कल्याण, डोंबिवलीहून दररोज सकाळी हजारो प्रवासी सीएसटीएमच्या दिशेने प्रवास करतात.

सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक जवळपास १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने रेल्वे प्रशासनाकडून तातडीने याची दखल घेण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असेल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील फोर्ट परिसरातील इमारतीचा भाग कोसळला!

News Desk

धोबी तलाव मधील एस एस गायकवाड रोड प्रकाशझोत

swarit

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसींग लिंक प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल! -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna