नवी दिल्ली | “पंतप्रधान मोदी, मला तुम्हाला लोकशाहीची थप्पड मारावीशी वाटते असे मी म्हटले होते. मी तुम्हाला थप्पड मारेन असे म्हटले नव्हते. मी तुम्हाला थप्पड का मारू ? तुम्हाला थप्पड दिली तर माझाच हात मोडेल. तुम्ही ५६ इंच छातीचा दावा करणारे पंतप्रधान आहात. तुम्हाला थप्पड मारणं तर सोडाच पण साधा स्पर्श करण्याचीही इच्छा नाही”, असे विधान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात मोठा शाब्दिक वाद रंगला आहे.
पंतप्रधान मोदींना तृणमूल काँग्रेस हा गुंडांचा पक्ष असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. “जेव्हा मोदी पश्चिम बंगालमध्ये येऊन म्हणतात कि तृणमूल काँग्रेस गुंडांचा पक्ष आहे. त्याचवेळी वाटते कि मोदींना जोरदार थप्पड ठेवून द्यावी. मोदींना त्याची गरज आहे. मी आजपर्यंत असा खोटारडा पंतप्रधान बघितला नाही. केवळ निवडणुका आल्या म्हणून त्यांना राम आठवण आहे”, अशी बोचरी टीका ममता बॅनर्जी यांनी केली होती.
पंतप्रधान मोदींनी याच पार्श्वभूमीवर ममतांनी प्रत्युत्तर देत टोला लगावला होता. “मला असे समजले कि ममता दीदींना मोदींना थप्पड मारायची आहे. ममता दीदी, मी तर तुम्हाला आदराने दीदी म्हणतो. तुम्ही दिलेली थप्पड देखील माझ्यासाठी आशीर्वादच असेल. मी ते सहन करेन”, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी ममता बॅनर्जी यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ममतांनी हे विधान केले आहे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.