HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

ठाकरे गटाला मोठा धक्का! शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मुंबई। केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षाचे नाव हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (१७ फेब्रुवारी) निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का मानला जातो. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे कोणते पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात गेल्या आठ महिन्यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी पक्षासोबत बंडखोरी केला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता. गेल्या आठ महिन्यापासून केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. अखेर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेनेला धनुष्यबाणाचे चिन्ह आणि शिवसेना पक्षाचे नाव दिले आहे.

बहुमताचा आणि लोकशाहीचा विजय – मुख्यमंत्री

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले आहे. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. राज्यात आपण पाहिले की, बहुमताचे सरकार स्थापन झाले असून हा निर्णय बहुमताचा आणि लोकशाहीचा विजय आहे. हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे.”

लोकशाहीवरचा विश्वास उडाला – संजय राऊत

तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आयोगाच्या निर्णयावर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, “केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा अपेक्षित होता. निवडणूक आयोग असो किंवा तपास यंत्रणा असो, हे कोणाचे तरी गुलाम असल्यासारखे वागत आहेत. पैशाच्या जोरावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह विकत घेतले जात असेल तर लोकशाहीवरचा विश्वास उडाला आहे.”

Related posts

“महाराष्ट्रातील माणूस असे गुन्हे करत नाही का? “त्या’ सूचनेवर चंद्रकांत पाटलांचा सवाल!

Ruchita Chowdhary

तुम्ही खलनायकाची भूमिका निभावली म्हणून मी हिरो ठरले, कंगनाचा सरकारला टोला

News Desk

महाविकासआघाडीला सामान्यांशी देणेघेणे नाही, केवळ कमाई करण्यावर भर!

News Desk