HW News Marathi
महाराष्ट्र

अनंत चतुर्दशीला गणेशाचे विसर्जन का?

मुंबई आज अनंत चतुर्दशी दिवशीच्या दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत विसर्जनाचा मुहूर्त आहे. तरीही दिवसभर मूर्तींचे विसर्जन करायला हरकत नाही. मात्र अनंत चतुर्दशीचा आणि गणेशमूर्ती विसर्जनाचा तसा काहीही संबंध नाही. तरीही अनंत चतुर्दशीलाच गणेशमूर्तींचे विसर्जन का केले जाते, याची आध्यात्मिक कारणे खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण समजावून सांगितली.

कधी कधी भाद्रपद पौर्णिमेच्याच दिवशी अपराण्हकाळी भाद्रपद कृष्ण प्रतिपदा असेल तर त्याच दिवशी महालयारंभ व प्रतिपदा श्राद्ध असते. महालयारंभापासून पितृपक्ष सुरू होतो. याच वर्षी उद्या बुधवारी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी महालयारंभ आलेला आहे. म्हणून गणेशमूर्ती विसर्जनाचा शेवटचा दिवस म्हणून अनंत चतुर्दशी हा ठरविलेला आहे.

या वर्षी दशमी तिथीची वृद्धी (म्हणजे दशमी तिथी दोन दिवस सूर्योदयाला) झाल्यामुळे बाराव्या दिवशी गणेशमूर्तींचे विसर्जन होत आहे. आज मंगळवार असला तरी गणेशमूर्तींचे विसर्जन करावयाचे आहे. कारण मंगळवारचा आणि गणेशमूर्ती विसर्जनाचा काहीही संबंध नाही. प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणून मूर्तीमध्ये देवत्व आणलेले असते,विसर्जनापूर्वी उत्तरपूजेनंतर मंत्र म्हणून ते देवत्व काढून घ्यायचे असते. आरतीनंतर घरातील सर्व मंडळी आपापल्या मनात श्रीगणेशाची प्रार्थना करीत असतात. घरातील सर्वांनी प्रार्थना करून झाल्यावर गणेशाने लवकर पुन्हा येण्यासाठी त्याच्या हातावर दही घातले जाते.

आणि नमस्कार करून मंत्र म्हटले जातात…

यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवम्।

इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनायच ।।

आवाहितदेवतां विसर्जयामि ।।

नंतर मूर्ती विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांकडून सर्व आमदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण

News Desk

12 वर्षीय मुलगी 27 आठवड्यांची गर्भवती

News Desk

“पोलिसांनी घालून दिलेल्या नियमात राज ठाकरेंनी सभा घ्यावी,” दिलीप वळसे पाटलांचे आवाहन

Aprna