HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या भेटीनंतर खडसे आज उद्धव ठाकरेंना भेटणार

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल (९ डिसेंबर) दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवसस्थानी जावून त्यांची भेट घेतली. खडसे आणि पवार यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मात्र, या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबद्दली अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. या दोघांच्या भेटींनी राजकीय वर्तुळात उलटसुटल चर्चेला उधाण आले आहे.

पवारांच्या भेटीनंतर आता खडसे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (१० डिसेंबर) भेट घेणार आहे. खडसे आणि ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. खडसेंनी पवारांच्या भेटीनंतर दिल्लीतील भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा न करता थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, आता खडसे राष्ट्रवादी की शिवसेना या दोन्ही पक्षांपैकी नक्की कोणत्या पक्षात प्रवेश करणार ?, यावर आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क काढले जात आहेत.

“माझ्यावर असाच अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल,” असा इशारा देखील खडसेंनी पक्षला दिला होता. भाजपच्या शनिवारी (७ डिसेंबर) पार पडलेल्या उत्तर महाराष्ट्राच्या विभागनिहाय कोअर कमिटीची बैठकीनंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर खडसेंनी दिल्लीला जावून भाजप नेत्यांशी नव्हे तर शरद पवारांची भेट घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड जिल्ह्यात संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ८०१ प्रकरणे निकाली

News Desk

“हे तर माध्यमांनीच वाढवून सांगितलं!”, पटोलेंचा ‘त्या’ वक्तव्यावरुन थेट माध्यमांवरच आरोप

News Desk

खासदार नवनीत राणांच्या तक्रारीत वस्तुस्थिती नाही; लोकसभा अध्यक्षांना राज्यसरकार माहिती देईल! – दिलीप वळसे पाटील

Aprna