HW News Marathi
देश / विदेश

हनीप्रीत-राम-रहीम जेलमध्ये येणार एकत्र ?

रोहतक-बलात्कारी बाबा राम रहीम सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. अलिशान जगात वावरणाऱ्या बाबाला जेलची हवा काही केल्या मानवत नाही. बाबाने दोन दिवसांपासून अन्नाचा कण घेतलेला नाही. केवळ फळे आणि पाणी पिऊन बाबा दिवस काढत आहे. दोन दिवसांपासून बाबाला झोप लागत नाही. तो रात्री-अपरात्री जेलमध्ये इकडून तिकडे चकरा मारत आहे. रात्री-अपरात्री अचानक मोठ्याने किंचाळत असून मी काय केले, माझा काय दोष असे तो म्हणत आहे. ही माहीती जेलमधून सुटून आलेल्या एका राजकीय कार्यकर्त्याने माध्यमांना दिली आहे. दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी बाबा राम रहीम याला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सध्या तो सिरसा येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे.

दरम्यान, प्रशासनाने बाबाची मानलेली मुलगी हनीप्रीतला रेडकॉर्नर नोटीस बजावली आहे. त्यामुळे तिची या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे. तिचा या प्रकरणात सहभाग आढळून आल्यास तिलाही अटक होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बाबा व हनीप्रीत पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोची शिपयार्डमध्ये ओएनजीसीच्या ‘सागर भूषण जहाजावर भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू, 13 जखमी

News Desk

सर्जिकल स्ट्राइकचा मोठ्या प्रमाणावर गवगवा करण्यात आला !

News Desk

धनंजय मुंडेंच्या जागी विधानपरिषदेवर शरद पवारांचा हा माणुस..

Arati More