HW News Marathi
देश / विदेश

धनंजय मुंडेंच्या जागी विधानपरिषदेवर शरद पवारांचा हा माणुस..

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विरोधी पक्षात असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून धनंजय मुंडे यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्याआधीचं महाविकासआघाडी सरकारमध्ये ते मंत्री झाले. पहिल्यांदाचं विधानसभेवर निवडून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी आता पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवर राष्ट्रवादीकडून काँग्रेस नेत्याला संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून संजय दौंड हे यांनी आज या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केेला. भाजपकडून राजन तेली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे निश्चित झालं आहे.

माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र संजय दौंड हे विधानपरिषदेच्या उर्वरित कार्यकाळासाठी आपले नशिब आजमावताना दिसणार आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये संजय दौंड यांनी धनंजय मुंडे यांना परळी मतदारसंघात विजयी होण्यासाठी मदत केली. त्यामुळे त्या मदतीची परतफेड म्हणुन संजय दौंड यांनी विधानपरिषदेवर संधी मिळाली आहे.

धनंजय मुंडे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ ७ जुलै २०२२ पर्यंत होता. पण ते विधानसभेवर निवडून गेल्यामुळे ही जागा रिक्त झाली. या जागेसाठी पोटनिवडणूक लागल्यानंतर भाजपने राजन तेली, तर राष्ट्रवादीने संजय दौंड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपसमोर महाविकास आघाडीतील तीन पक्षांचं आव्हान असेल. दरम्यान, विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता या जागेवर महाविकास आघाडीचा मार्ग सुकर दिसतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दत्तात्रय होसबोळेंची संघ सरकार्यवाहपदी निवड

News Desk

जाहीरातींमध्ये ‘पप्पू’ ऐवजी ‘युवराज’ या शब्दाचा वापर, निवडणूक आयोगाने फटकारताच बदल

News Desk

#PulwamaAttack : ‘अमर रहे’च्या घोषणांनी, बुलडाण्यातील दोन्ही शहीद जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

News Desk