HW News Marathi
Uncategorized

आजपासून पुन्हा कोट्यधीश बनण्याची संधी!

मुंबई : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो आणि सर्वमान्यांना कोट्यधीश होण्याची संधी देणारा कार्यक्रम अर्थात कौन बनेगा करोडपती आजपासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कार्यक्रमाचे हे ९वे सत्र असून त्यात स्पर्धकांना सर्वाधिक तब्बल ७ कोटी रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. आज (सोमवार)पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे.

मर्यादित भागांच्या ‘केबीसी९’ या सत्रात नवीन लाइफलाइन्स व आकर्षक बदल दिसणार आहेत. ‘फोन-अ-फ्रेंड’ ही लाइफलाइन आता ‘व्हिडिओ-अ-फ्रेंड’ अशी असेल. तसेच ‘जोडीदार’ ही नवी लाइफलाइन असून त्यात स्पर्धक आपल्या जोडीदारालाही हॉट सीटवर आणू शकणार आहेत. त्याचबरोबर ‘सर्व काही किंवा काहीच नाही’ असा नवा सौदा या सत्रात असेल. ‘जॅकपॉट’चा प्रश्न या वेळी ७ कोटी रुपयांचा असून या वेळी बक्षीसे धनादेशाऐवजी थेट विजेत्याच्या खात्यात जमा केली जातील. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी केवळ ७ दिवसांत तब्बल १९.८ दशलक्ष लोकांनी नोंदणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

झाकीर नाईकविरोधात आरोपपत्र दाखल

News Desk

बेरोजगारांना पाच लाख कमावण्याची संधी

News Desk

‘पुण्यामध्ये tv9 चे पत्रकार रायकर यांचा खुन झाला?महाविकाआघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर भाजपचे गंभीर आरोप !

News Desk