HW News Marathi
Uncategorized

हिंदूत्वाची व्याख्या संघाने बदलली

इंदूर: ज्याप्रमाणे जर्मन लोकांचा देश जर्मनी आहे, ब्रिटिशांचा देश ब्रिटन आहे, अमेरिकन नागरिकांचा देश अमेरिका त्याचप्रमाणे हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे. पण हा देश फक्त हिंदूंचा नाही तर इतर धर्मियांचाही आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. शुक्रवारी इंदूरमधील एका महाविद्यालयातझालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. एवढेच नाही तर कोणताही एक नेता किंवा एक पक्ष हा देशाला महान बनवू शकत नाही, तर त्यासाठी समाजाचेही मोठे योगदान असावे लागते, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

भागवत यांच्या वक्तव्यामुळे संघाने हित्वूत्वाची व्याख्या बदलल्याचे बोलले जात आहे. तसेच मोदी या एका व्यक्तीकडून देशाचे भले होणार नसल्याचेही अप्रत्यक्षपणे बोलून दाखवले आहे.पूर्वी काहीही समस्या भेडसावू लागली की लोक देवाकडे साकडे घालत किंवा देवाला दोष देत. सध्या कलियुग आहे त्यावेळी लोक सरकारला दोष देतात. मात्र सरकार समस्या निवारण्याचे काम तेव्हा करते जेव्हा समाजही त्यांना साथ देतो. जेव्हा समाज बदलतो तेव्हा सरकारवरही त्याचा परिणाम बघायला मिळतो. सरकारी यंत्रणांमध्येही बदल बघायला मिळतात. भारतामध्ये जगातील महासत्ता होण्याची क्षमता आहे. महासत्ता व्हायचे असेल तर जनतेला आपल्या डोक्यातून आणि मनातून भेदभाव हा शब्द कायमचा खोडून टाकावा लागेल, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडण, पुढं जाऊन संसार कसा होणार ?

News Desk

नवाब मलिक हे एका चिडीतून सगळं करताय शिवसेना खासदार संजय राऊतांच वक्तव्य

News Desk

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत शिवसेनेचं मोठं विधान, शिवसेना काँग्रेसच्या वाटेवर!

News Desk