HW News Marathi
महाराष्ट्र

पुन्हा रेल्वे अपघात; दुरांतो एक्स्प्रेसचे ९ डब्बे घसरले

मुंबई : उत्तर भारतातून सुरू झालेले रेल्वे अपघातांचे सत्र अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीये. ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी हार्बर मार्गावर लोकल घसरल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सकाळी नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे ९ डबे मध्य रेल्वेवरीलआसनगाव- वाशिंद स्थानकांदरम्यान रुळांवरून घसरले. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रुळाखालीलखडी वाहून गेल्याने हा अपघात झाला असून यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

दुरांतो एक्स्प्रेस नागपूरहून मुंबईकडे येत असताना सकाळी साडेसहाच्या सुमारास आसनगाव- वाशिंददरम्यान एक्स्प्रेसच्या इंजिनसह चार डबे रुळावरून घसरले. अपघातामुळे कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांची वाहतूक खोळंबली आहे. रेल्वेची आपात्कालीन गाडी व पथक घटनास्थळी रवाना झाले असून घसरलेले डब्बे रुळांवरून हटविण्याचे काम सुरू आहे, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी जैन यांनी सांगितले. दरम्यान, अपघातातील जखमींनास्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

परळी काॅंग्रेस शहराध्यक्षांसह जवळपास २५ जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Aprna

भाजपकडून डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी

swarit

बचत गटांच्या महिलांच्या १-१ रुपयाने बनली लाखोंची रक्कम

News Desk
देश / विदेश

आसाराम बापूला जामीन मिळणार का ?

News Desk

वी दिल्ली- आसाराम बापू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले. चार वर्षांपासून आसाराम बापू जेलमध्ये आहेत. मात्र, अद्याप पीडित महिलेची साक्ष घेण्यात आलेली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिले असून त्यानंतरच आसाराम बापुच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

76 वर्षीय आसाराम बापुने 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. ऑगस्ट 2013 पासून राजस्थान कारागृहात ते बंद आहेत. दोन महिन्यानंतर आसाराम बापू आणि त्यांच्या मुलगा नारायण साई यांच्यावर सुरतमधील आश्रमात दोन बहिणींवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गांधीनगरमधील न्यायालयात खटला प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात आसाराम बापू यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गुजरात सरकारने आसाराम बापूंमुळेच खटल्याला उशीर होत असल्याची माहिती दिली आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आरोप करणा-या पीडित महिला आणि इतर साक्षीदारांचा जबाब तात्काळ नोंदवण्याचा आदेश दिला होता. जवळपास 40 साक्षीदार असून अद्याप त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही.

Related posts

मोहम्मद शमीने केले धक्कादायक खुलासे !

News Desk

देशात कोरोनामुळे आतापर्यंत १६६ जणांचा बळी, तर ४७३ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

News Desk

विधान परिषदेत भाजपचा पहिला विजय; ज्ञानेश्वर म्हात्रेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले

Aprna