HW News Marathi
देश / विदेश

५० लाखांचा विमा उतरवून बहिणीची हत्या

नवी दिल्ली : बहिणीचा ५० लाखांचा विमा उतरवून डॉक्टर भावाने बहिणीचा खून केल्याची थरारक घटना येथे घडली आहे. पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत त्याला जेरबंद केले आहे. बुराडीच्या अजित विहारमध्ये मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला. एका महिलेची तिच्या पतीने हत्या केल्याचे सांगणारा फोन पहाटे पोलिसांना आला होता.

अनिता असे मृत महिलेचं नाव असून तीपटनाची रहिवासी होती. पोलीस तपासात अनिताचा भाऊ डॉ. कमलने हत्याची तसेच पोलिसांना फोन केल्याची कबुली दिली आहे. तोआरएमपी डॉक्टर असून शेजारीच प्रॅक्टिस करतो. कमलचे दोन विवाह झालेले आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचं निधन झाले आहे. दोन्ही पत्नींपासून त्याला ८ मुलं आहेत. गेल्याचार-पाच वर्षांपासून त्याच्यावर १२ लाखाचं कर्ज होतं. ते फेडणं त्याला अशक्य झाले होते. सप्टेंबर २०१६ रोजी रक्षाबंधनची भेट म्हणून त्याने बहिणीचा ५० लाखांचा विमा उतरवला होता. बहिणीला मुल नसल्याने त्यानेविम्यावर स्वत:चे नाव वारस म्हणून नोंदविले होते. विम्याचे हप्तेही त्यानेच भरले होते. मंगळवारी पहाटे संधी साधून तो बहिणीच्याघरात घुसला आणि झोपेत असलेल्या अनिताचा गळा दाबून खून केला. पोलीस तपासात त्याने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूलकरण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निर्भयाचे गुन्हेगार फासावर लटकल्याने कायद्याचा सन्मान राखला गेला !

News Desk

माझा आतला आवाज सांगत होता की…! केदारनाथमध्ये मोदींचं विधान

News Desk

महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार जर सर्कस असेल, तर एका विदुषकाची गरज !

News Desk