HW News Marathi
क्राइम

ट्रकच्या धडकेनं कार नदीत कोसळली, तिघांचा मृत्यू

उत्तम बाबळे

नांदेड :- हदगाव जवळील मराठवाडा व विदर्भ सिमेवरील पैनगंगा नदी पुलावर ट्रकने २५ आॅगस्ट रोजी सकाळी ११:०० वाजता जोराची धडक दिली.या अपघातात कार नदीपात्रामध्ये जाऊन कोसळल्याने कार मधील तीन जण जागीच ठार झाले आहेत. भाजपाचे आमदार अनिल गोटे यांचे धाकटे बंधू , त्यांच्या सुविद्य पत्नी व कार चालकाचा यांचा मृत्यू झाला आहे.

भाजपाचे आमदार अनिल गोटे यांचे धाकटे बंधू ज्ञानेश्‍वर गोटे हे परभणी येथे वैद्यमापन शास्त्र विभागात सहाय्यक नियंत्रक म्हणून कार्यरत होते. ज्ञानेश्वर गोटे हे त्यांच्या सुविद्य पत्नी रत्ना गोटे यांच्या समवेत पत्नीच्या बहिणीला भेटण्यासाठी फोर्ड फिगो कारने २५ आॅगस्ट २०१७ रोजी सकाळी परभणी येथून नागपुरला जात होते. हदगाव जवळील मराठवाडा व विदर्भाला जोडणार्‍या पैनगंगा नदीच्या पुलावर त्यांची फोर्ड फिगो कार आली असताना पाठीमागुन येणार्‍या अज्ञात ट्रकने कारला धडक दिली. ट्रकचा वेग इतका होता की,ती कार पुलावरून कोसळून नदीपात्रात जाऊन पालथी पडली. त्यामुळे कारमधील तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग नसल्याने कार पुढे जाऊ शकली नाही व पाण्यातच अडकली. हा अपघात झाल्याचे या मार्गावरून जाणार्‍या वाहन चालकांनी व स्थानिक शेतकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.

यावेळी तेथील नागरिक गोविंदराव वाघमारे, पोलीस पाटील परमेश्वर भालेराव, पोलिस जीप चालक सुदर्शन धांदु व पोलिसांच्या मदतीने कारमधील मयतांना बाहेर काढण्यात आले.तसेच कारमधील कागदपत्रांची तपासणी केली असता मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे मयतांची ओळख पटली. ते मयत परभणी येथील वैधमापन विभागाचे सहायक नियंत्रक अधिकारी असलेले ज्ञानेश्‍वर उमराव गोटे त्यांची सुविद्य पत्नी रत्ना ज्ञानेश्‍वर गोटे, व चालक नागनाथ काशिनाथ विठूबोने (३५) रा.मापा ता.सेलू जि.परभणी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिघांचे मृतदेह हदगाव येथील शासकीय रुग्णालयात शेवविच्छेदनासाठी आणले व अपघाताची माहिती धुळे येथील त्यांच्या नातेवाईकांना दिली. तर हदगावचे पत्रकार पंडितराव पतंगे यांनी अा. अनिल गोटे यांच्याशी दिल्ली येथे थेट भ्रमण ध्वनीवरून संपर्क साधला व त्यांना या अपघाताची माहिती दिली. मयताचे नातेवाईक अहमदपूर, औरंगाबाद व धुळे येथून हदगावला आले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.तसेच त्यांनी हदगाव येथेच अंत्यविधि करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच हदगावचे पो. नि. केशव लटपटे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय वाळके, स.पो.नि. एफ.आय.खान,पो.उप नि. नागसेन साळवे, स.पो. उप नि.जाधव, जमादार अरविन्द गायकवाड. अखील बेग, गणेश गिरबिडे इत्यादींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान अपघात करुन पलायन केलेल्या त्या ट्रकची माहिती आर्णी पोलिसांना मिळाल्यावरुन त्यांनी एम.एच. २४ ए. यू. ८१०९ क्रतामांचा तो ट्रक शिताफिने पकडला असून रात्री उशीरा त्यास हदगाव पोलीसात आणण्यात आले.रात्री उशीरा आ.अनिल गोटे यांचे मधवे बंधू व मयत गोटे यांचा मुलगा हदगाव जि.नांदेड येथे पोहचणार आणि त्यानंतरच अंत्यविधीचा अंतिम निर्णय होणार असल्याचे पोलीस सुत्रांकडून समजले. नदी पुलावर कठडे नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले – डाॅ.संजय पवार पैनगंगा नदी वर पुलाला कठडे नसल्यामुळे वारंवार असे आपघात होत आहेत. वारंवार तक्रारी करून सुद्धा आधिकारी त्याकडे लक्ष देत नाहीत. यापुर्वी देखील वाहन पडून अनेक नागरीकांना प्राणास मुकावे लागले आहे. जर त्या पुलाला कठडे असते तर हा आपघात घडलाच नसता असे नागरीकातून बोलल्या जात आहे. या अपघातास राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा ऊमरखेड ऊपविभाग सर्वस्वी जबाबदार असल्याचे शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख डॉ. संजय पवार यांनी मत व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शेतकऱ्यांच्या मृत्यूवर PM मोदी गप्प का”? – कन्हैया

News Desk

खासदार तडस यांच्या कौटुंबिक वादात मोठा ट्विस्ट…

News Desk

शेवगाव आखेगाव रस्त्यावर दोघांचा खून

News Desk