HW News Marathi
राजकारण

आता मोदी राफेल घोटाळ्यातून कमावलेल्या पैशाने आमदार विकत घेत आहेत !

नवी दिल्ली | “पंतप्रधान मोदींनी राफेल घोटाळ्यातून अमाप पैसा कमावला आहे. त्याच पैशाने आता मोदी आमदार विकत घेत आहेत”, असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीत आपचे अरविंद वाजपेयी यांच्या भाजपप्रवेशानंतर आता आपचे आमदार देवेंद्र सिंह सहरावत हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी राफेल घोटाळ्यातून अमाप पैसा कमावला आहे. त्यातूनच आता मोदी आमदार विकत घेत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. ते आज (६ मे) पत्रकार परिषदेत बोलत होते.

“नोटाबंदी हा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. यंदाही जर व्यापाऱ्यांनी भाजपला मत दिले तर हे सीलिंग सुरूच राहील. मात्र, जर तुम्ही ‘आप’ला मत दिले तर हे सीलिंग बंद होऊ शकते”, असे दिल्ल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. “पंतप्रधान मोदी असा दावा करतात कि आम्ही घरात घुसून दहशतवाद्यांना मारले. पंतप्रधान मोदींचे पाकिस्तानसोबत अत्यंत जवळचे संबंध आहेत. पाकिस्तानी लोकांना पुन्हा मोदीच पंतप्रधान व्हावेत असे वाटते. मग ते राष्ट्रवादी कसे ?”, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…जळगाव मतदारसंघाबाबत

News Desk

भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल

Gauri Tilekar

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेतून बरेच लोक भाजपच्या पक्क्या घरात प्रवेश !

News Desk