HW News Marathi
देश / विदेश

प्रेयसीने प्रियकराला भोसकले

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): प्रियकराने स्वयंपाक करणार नाही, म्हटल्याने त्याच्या प्रेयसीचा राग अनावर झाला आणि तिने चाकूचे वार करून त्याला ठार करून टाकल्याची धक्कादायक घटना नवी दिल्लीत उघडकीस आली. इल्व्ही उजुम्मा असे प्रेयसीचे नाव असून तिने इझू नावाच्या प्रियकराला निर्दयपणे ठारे केले आहे. दोघे नायजेरियने असून पोलिसांनी प्रेयसीला ताब्यात घेतले आहे. उजुम्माने तिचा प्रियकर इझूला दुपारी तिच्या घरी बोलावले, थोडावेळ त्या दोघांमध्ये चांगला संवाद रंगला मात्र अचानक वाद सुरू झाला, आवाज वाढला, ज्यानंतर त्यांच्या शेजाºयांनी या भांडणात लक्ष घातले म्हणून हे दोघेही शांत झाले. मात्र, या दोघांचे शेजारी तिथून निघून गेल्यावर इझू आणि उजुम्मा या दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. रात्रीचे जेवण कोण तयार करणार? या कारणावरून दोघांमध्ये भांडणच जुंपलं यानंतर उजुम्मा स्वयंपाक घरात गेली आणि तिथून तिने चाकू आणला आणि त्याचा धाक तिने इझूला दाखवला. इझूने ऐकलं नाही तेव्हा उजुम्माने त्याच्यावर वार केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसची मोदी सरकारविरोधात ‘भारत बचाव रॅली’

News Desk

कुलगाममध्ये सुरु असलेल्या चकमकीत १ दहशतवाद्याचा खात्मा

News Desk

धक्कादायक ! तेलंगणामध्ये महिला पोलिसाला जबर मारहाण

News Desk