HW News Marathi
मुंबई

यंदाच्या लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन!

मुंबई – येथील सुप्रसिद्ध लालबागच्या राजाचा प्रथम मुखदर्शन सोहळा सोमवारी संध्याकाळी राजाच्या मंडपात प्रसारमाध्यमांसह गणेशभक्तांसाठी आयोजित करण्यात आला होता. यंदा राज्याच्या सिंहासनावर कासवाची आरास करण्यात आली आहे. ही आरास भक्तांचे लक्ष विशेष आकर्षून घेणार आहे.

लालबागच्या राजाची गणेशमूर्ती दरवर्षी सारखीच ठेवण्यात येत असली, तरी त्याच्या सिंहासनामध्ये दरवर्षी बदल करण्यात येत असतात. त्यामध्ये बाप्पाची प्रभावळ वैशिष्टपूर्ण ठेवण्याकडे कल असतो. गतवर्षी बाप्पांच्या प्रभावळीवर घुबडाला स्थान देण्यात आले होते. अशुभ मानल्या जाणाऱ्या घुबडाला प्रभावळीवर स्थान देण्यात आल्याने त्यावर टीका झाली होती.

दरम्यान, यावर्षीच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या सिंहासनाची सजावट कशी असेल, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. सोमवारी रात्री झालेल्या प्रथम मुखदर्शन सोहळ्यात बाप्पांच्या सिंहासनावरील कासवांची आरास पाहून भक्त आनंदित झाले. या आराशीमध्ये बाप्पांच्या प्रभावळीवर पूर्णपणे कासवाचे चित्र आहे. तर आसनाच्या चारही खुरांवरही कासवांच्या मूर्ती आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणीबागेसाठी पेंग्विनचा पायगुण शुभ

News Desk

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर मिटला बेस्टचा संप

News Desk

कुर्ला स्थानकात पाणी साचले, मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने

News Desk