HW News Marathi
मुंबई

कुर्ला स्थानकात पाणी साचले, मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने

मुंबई | आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत आज (८ जुलै) पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि उपनगराच्या काही भागात पावसाचा प्रचंड जोर पाहायला मिळाला. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुर्ला रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सीएसएमटीच्या दिशेने सुरू असलेली रेल्वे वाहतूक १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहे.

मुंबईतील रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्त्यावर गाड्यांच्या लांबच्या लाग रागा लागल्या आहेत. सखल भागा पाणी साचल्यामुळे लोकांना कामावर येण्यास विलंब होत आहे. घाटकोपर, विक्रोळी आणि कुर्ला परिसरात जोरदार पाऊसमुळे स्टेशन परिसरात पाणी साचले आहे. तर मरोळ मेट्रो स्टेशनबाहेर पाणी साचले आहे. पाऊस जर असाच कोसळत राहिला तर याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सहायक पोलीस आयुक्तसोबत रिक्षा चालकांची मुजोरी

News Desk

मुंबईत सीएसटीसमोर चालत्या टॅक्सीनं घेतला पेट

News Desk

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्माराकावरून काँग्रेस-राष्ट्रवादीची कोल्हेकुई सुरु

News Desk