HW News Marathi
देश / विदेश

बलात्कारचा प्रयत्न फसल्याने इमारतीवरून ढकलले

नवी दिल्ली – मैत्रिणीवर बलात्काराचा प्रयत्न फसल्याने नराधमाने तरुणीला इमारतीवरून फेकून दिल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली. ही २१ वर्षीय तरुणी पंचतारांकीत हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होती. सध्या ती गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

बेगमपूरमधील रोहिणी भागातल्या एक बांधकाम सुरू असलेल्या इमारतीशुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. या मुलीच्या मैत्रिणींनी पोलिसांना बोलावले, तेव्हा घटनास्थळी ही युवती नग्नावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

आरोपी व तरुणी आधी एकाच हॉटेलात काम करत होते. नंतर आरोपीची बदली अन्य फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये झाली. घटनेच्या दिवशी पीडित तरुणी आणि तिच्या अन्य दोघी मैत्रिणी आरोपीच्या घराखाली रिक्षाने आल्या. आरोपीने त्या दोघींनारिक्षातच थांबायला सांगितले आणि पीडितेची आईशी ओळख करून येतो, असं सांगत तिला घेऊन गेला. पण घरी नेण्याऐवजी त्याने तिला फरफटत एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेले आणि तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. पीडितेने प्रतिकार केला, तेव्हा त्याने तिला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जेएनयू हल्ल्यात आइशी घोषसह ९ जण संशयित आरोपी, दिल्ली पोलिसांची माहिती

News Desk

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकारला ‘ऑपरेशन लोटस’चा धोका

News Desk

#MeToo : मला भीती दाखवून माझ्याशी संबंध प्रस्थापित केले !

Gauri Tilekar