HW News Marathi
क्राइम

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली | स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूचा मुलगा नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नारायण साईला बलात्कार प्रकरणी सुरत सत्र न्यायालयाने आज (३० एप्रिल) १ लाखांचा दंडही ठोठावला आहे. नारायण साईच्या चार साथिदारांना प्रत्येकी १० वर्षाच्या तुरुंगवसाची शिक्षा सुनावली आहे. सुरत येथील दोन बहिणींनी नारायण साई याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरविले आहे.

या बलात्कार प्रकरणी ५३ जणांची साक्ष नोंदविण्यात आली असून गुन्हा दाखल केल्यानंतर नारायण साई फरार झाला होता. यानंतर दोन महिन्यांनी त्याला अटक करण्यात आली. तीन दिवसांपूर्वी न्यायालयाने त्याला या प्रकरणी दोषी ठरवले होते आणि निर्णय राखून ठेवला होता. अखेर मंगळवारी या प्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रश्मी शुक्लांविरोधात महत्त्वाचे तपशील हाती असल्याचा दावा

News Desk

भाजप पदाधिकारी रुपाली चव्हाण यांची क्रूर हत्या

Gauri Tilekar

आरोपीच्या नातलग महिलांचा पोलिसांवर हल्ला बोल

News Desk