HW News Marathi
राजकारण

शरद पवार यांचा पुन्हा यूटर्न !

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पंतप्रधान पदाबाबतच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या. मात्र, शरद पवार यांनी आता आपल्या या वक्तव्यावरून यूटर्न घेतला आहे. “पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त बाकी पर्याय कोणते ? असे विचारल्याने मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्या नावांचा उल्लेख केला”, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

“माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त बाकी पर्याय कोणते ? असे विचारल्याने मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांची नावे घेतली”, असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे.

“जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर विरोधकांमधून हे ३ जण पंतप्रधान पदासाठी प्रमुख उमेदवार असतील”, असे शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. “राहुल गांधी यांनी अनेकदा स्वतःच सांगितले आहे कि ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाहीत”, असेही शरद पवार यावेळी म्हणाले असल्याचे वृत्त होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#RafaleDeal : संसदेत ‘कॅग’चा अहवाल सादर, विरोधकांची जोरदार प्रदर्शने

News Desk

आम्ही आधी मुलांना घेतले अन् वडील आपोआप आले !

News Desk

माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी केली विखेंची पाठराखण

Gauri Tilekar