HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेड–नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात; १० जण गंभीर जखमी

नांदेड । नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अर्धापूर तालुक्यातील पार्डी म. गावाजवळ झालेल्या एस टी बस आणि कंटेनर अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा आपघात आज (१२ मे) सकाळी घडला. जखमींना महामार्ग पोलिसांनी उचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविले आहे.

नांदेडहून हिंगोलीकडे जाणारी बस क्र. ( एम एच 20 बी एल 1707 ) व वारंगाहून नांदेडकडे येणारा कंटेनर क्रमांक (आर. जे. 32 जी. बी. 7101) बसवर आदळला. या आपघतात एसटी चालक रेशमाजी फुले, वय 55 नांदेड गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय गोदावरी पवार ( वय 65) , गंगाराम पवार ( वय 72 दोघे रा.शाहापुर वाडी) , यशवंत लढे (मेंढला वय 45) विजय राजे पुसद ( वय 70) सुभाष मस्के (वय 65) यांच्यासह 4 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर अन्य 15 जण किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले. यावेळी घटनास्थळी 108 रुग्णवाहिकेचे डॉ. आनंद शिंदे, चालक रणधीर लंगडे व महामार्ग पोलीस रमाकांत शिंदे, ज्ञानेश्वर तिडके, गजानन कदम, संभाजी मोरे, वसंत सिनगारे परिसरातील नागरिकांनी जखमींना मदत केली. या आपघातामुळे काही वेळ वाहतूक सेवा विस्कळित झाली होती.मात्र पोलिसांनी वाहतूक पूर्ववत सुरू केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maratha Reservation | मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करणार

News Desk

नितेश राणेंनी फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांना करुन दिली ‘एक आठवण’!

News Desk

उद्धव ठाकरेंचा निरोप आला आणि फडणवीसही थांबले, कोल्हापूरात केली एकत्र पाहणी

News Desk