HW News Marathi
क्राइम

उपसरपंचाचा निर्घृण खून

कोल्हापूर- इचलकरंजी येथे कोंडीग्रेजवळ खोतवाडीचे विद्यमान उपसरपंच विनायक माने (३५) यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

रस्त्याकडेला असणा-या चरीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला. जयसिंगपूर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात विनायक माने हे रात्री उशिरा मित्रांसमवेत खोतवाडीजवळच्या कोल्हापूर धाब्यावर जेवण करीत होते. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचे फोनवरुन त्यांच्या आईशीही बोलणे झाल्याचे समजते.

आर्थिक देवाणघेवाणीतून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली. या खून प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरिक्षक दत्तात्रय कदम करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीबीआयकडून युक्तीवाला सुरूवात

News Desk

गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज फेटाळला!

News Desk

मुलावर अॅसिड हल्ला

News Desk