नवी दिल्ली | “माझ्या खांद्यावर संपूर्ण उत्तर प्रदेशच्या प्रचाराची जबाबदारी आहे. माझ्यावर एक नव्हे तर ४१ मतदारसंघात काँग्रेसला विजयी करण्याची जबाबदारी आहे. एकाच ठिकाणी राहून मला हे सर्व सांभाळणे शक्य होणार नाही”, असे म्हणत काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आपण निवडणुकीसाठी का उभे राहत नाही याबाबतचे कारण स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक दिवस प्रियांका गांधी या वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध उभ्या राहतील अशी जोरदार चर्चा होती. मात्र, त्यानंतर काँग्रेसकडून प्रियांका गांधी या निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
Priyanka Gandhi Vadra, Congress Gen Secy for UP (East) in Amethi: Issues are clear; employment, education & health.Nationalism is to solve problems of people. Here they don't listen to people, when they raise their issues they suppress them, it's neither democracy nor nationalism pic.twitter.com/6TfbpTqzi6
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 28, 2019
आगामी लोकसभा निवडणुकीत आपण पंतप्रधान मोदींविरुद्ध वाराणसीतून लढण्यास तयार असल्याचे प्रियांका गांधी यांनी काहीच दिवसांपूर्वी म्हटले होते. मात्र, काँग्रेसने वाराणसी मतदारसंघातून अजय राय यांना उमेदवारी देत या चर्चांना पूर्णविराम दिला. प्रियांका गांधी या २८ मार्चला जेव्हा युपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रचारासाठी रायबरेलीत गेल्या त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निवडणूक लढविण्याची विनंती केल्यानंतर प्रियांका गांधी यांनी “मी वाराणसीतून निवडणूक लढवू का ?” असा प्रश्न कार्यकर्त्यांनाच विचारला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.