HW News Marathi
महाराष्ट्र

आदिवासी बांधवांनी साजरा केला जागतिक आदिवासी दिन

मुंबई – जागतिकआदिवासी दिन व क्रांती दिनानिमित्त नॅशनल पार्क ते आरे कॉलनी पर्यंत श्रमजीवी संघटनेचे नेते व संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट रोजी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये आदिवासी क्रांती वीरांचे स्मरण करण्यात आले. तसेच यावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

संयुक्त आदिवासी संघाने 9 ऑगस्ट हा दिन आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याचे मान्य केले. त्या अनुषंगाने आदिवासी दिन साजरा करण्यात आला. मात्र आजही राज्य शासनाने याला मान्यता दिली नाही. मुंबईत आदिवासी वास्तव्यास नसल्याचे राज्य शासनाचे म्हणणे आहे , मात्र प्रत्यक्षात आजही 222 आदिवासी पाडे मुंबईत आहेत. त्या प्रत्येक पाड्यातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा प्रधान करून या रॅलीत सहभाग घेतला.

9 ऑगस्ट रोजी ठाणे, पालघर जिल्ह्यात ही रॅली काढण्यात आली. या रॅलीला श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी उपस्थिती लावली. यावेळी भोईर यांनी आदिवासी क्रांती दिनाची माहिती व महत्त्व विषद केले. तसेच यावेळी आरे, बोरिवली व दहिसर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा सत्कार करण्यात आल्याची माहिती श्रमजीवी संघटनेच्या जिल्हाप्रमुख नलिनी बुजड यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

करुणा शर्मा यांच्या जामिनावर आज सुनावणी!

News Desk

हल्ली महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्यं; अजित पवारांची पंतप्रधानांकडे तक्रार

Aprna

राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते पुण्याच्या ‘आयएनएस शिवाजी’ संस्थेचा होणार सन्मान

swarit