HW News Marathi
मुंबई

अल्पवयीन मुलावर १५ मित्रांकडून लैंगिक अत्याचार

मुंबई – कठोर कायदे करूनही महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. त्यातच आता मुलावरही लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे.

अंधेरी परिसरात एका १५ वर्षांच्या मुलावर शेजारी राहणाऱ्या काही मुलांकडून तब्बल वर्षभरापासून अनैसर्गिक अत्याचार होत होते. दुर्दैवाची बाब म्हणजे हे अत्याचार करणारी १५ मुलेही अल्पवयीन आहेत. पोलिसांनी त्यापैकी मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

अंधेरी पश्चिम येथे हा प्रकार जवळपास वर्षभरापासून सुरू होता. पीडित मुलगा आजीसोबत राहात असून त्याच्या आसपास राहणारे मित्रच त्याचे शारिरीक शोषण करत होती. कधी मैदानात तर, कधी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन त्याच्यावर शारिरीक अत्याचार केले जात होते. शेवटी हे असह्य झाल्याने पीडित मुलाने हा प्रकार त्याच्या अन्य मित्राला सांगितला. त्यानंतर हा मित्र मुलासोबत पोलिस ठाण्यात गेला आणि या प्रकाराला वाचा फुटली.

याप्रकरणी आम्ही कलम 377 (अनैसर्गिक अत्याचार) आणि बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4, 6, 8 आणि 12 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, डी. एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पिंगळे यांनी सांगितले.

मानसोपचार तज्ज्ञांना काय म्हणतात?

राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ज्ञ.

या प्रकरणातील सर्व मुले समलैंगिक आहेत असे म्हणता येणार नाही. त्यातील एक दोघे जण असूही शकतील. या मुलांना मी संधीसाधू म्हणेन, जिथे एखादी गोष्ट लगेच मिळण्यासारखी आहे, तिथे तिचा उपभोग घेतला जातो. एकाचे बघून दुसरा करतो अशातला हा प्रकार आहे. या प्रकरणात मुलगी पीडित असती, तर त्याचा गवगवा झाला असता, मुलगा असला की कोणी एवढे लक्ष देत नाही. याचाशी या मुलांनी फायदा उचलला असावा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निष्टांवतांना डावलून नवख्यांना पद दिल्याने शिवसेनेत हाणामारी

Adil

लेट लथिफ मुंबई विद्यापीठ -210 परिक्षांच्या निकालासाठी 45 दिवस

News Desk

दादर स्टेशनला डॉ आंबेडकरांचे नाव द्या | भीम आर्मी

News Desk